विहीर अनुदान योजना-2024
मित्रांनो आज आपण महाराष्ट्रशासनाच्या विहीर अनुदान योजनेविषयी संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. जे कि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपली शेती बागायत करता येईल. यादृष्टीकोनातून शासनाने विहीर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 -24 अंतर्गत ऑनलाइन online पद्धतीने अर्ज करणे सुरू झालेले आहेत. आपण आपला अर्ज हा ऑफलाइन ofline पद्धतीने सुद्धा करू शकता. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 4,00000 रुपये अनुदान दिले जाते. या दिलेल्या अनुदानातून राज्यातील पात्र शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदू शकतो.
विहीर योजनेचे उद्दिष्ट:
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने मागासवर्गीय विहीर योजना ची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करून त्यांचे जीवनमान सुधारणे.
- शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य दूर करून तो संपविणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी शासनामार्फत अनुदान उपलब्ध करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
- शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये तसेच पाण्याच्या चिंतेपासून त्यांची मुक्तता करणे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकयांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून व्याजाने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत असे शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत.
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी
- भटक्या व विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील शेतकरी
- महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला शेतकरी
- इंदिरा आवास योजनेअंतर्गत येणारे लाभार्थी
- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील जॉब कार्ड धारक व्यक्ती
- दारिद्र्यरेषेखाली (BPL धारक ) लाभार्थी
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क अधिकरण अधिनियम 2006 खालील लाभार्थी.
- सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे एक हेक्टर पेक्षा कमी अथवा अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
- अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
- शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती शेतीकर्ता असलेली कुटुंबे.
नवीन विहीर अनुदान योजना
महाराष्ट्र अंतर्गत दिले जाणारे
अनुदान:
- लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.
- मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया पूर्ण केली जाते. योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया हि ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात येईल.
- ग्रामसभा / ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील. त्यानंतर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
विहीर अनुदान योजना 2024 अंतर्गत
अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
- अर्ज पेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही.
- या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकेल व त्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा आणि पैसे दोघांची बचत होईल.
विहीर योजना साठी आवश्यक
कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8 अ
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
- सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्रनामा.
Tags:
विहीर अनुदान योजना-2024