प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

 

नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री सिंचन योजनेविषयी पाहणार आहोत या लेखात शासनाद्वारे राबविण्यांत येणाऱ्या ठिबक सिंचन हि पिकांना आधुनिक पद्धतीने पाण्याचा वापर करून पिंकांची जुपासना कशी केली जात याविषयी आणि ठिबक सिंचन योजनेस मिळणारे अनुदानाविषयी पाहणार आहोत.

पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब-थेंब  पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिवक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते.

तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते) हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते. ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे. पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह, पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दावून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.

अनुदान: 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालीलप्रमाणे असेलः

  • ) अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी - ५५ % अनुदान
  • ) इतर शेतकरी - ४५% अनुदान

पात्रता:

  • शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे.
  • शेतकऱ्याकडे /१२ प्रमाणपत्र आणि - प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
  • शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
  • सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
  • शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म- सिंचन संच विकत घ्यावे, पावे. ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.

 आवश्यक कागदपत्रे:

  • 7/12 प्रमाणपत्र
  • 8- A प्रमाणपत्र
  • विज बिल
  • खरेदी केलेल्या संचाचे बिल
  • पूर्व संमती पत्र

 आपले सरकार DBT साठी ऑनलाईन नोंदणी:

  •  अर्जदार ऑनलाईन नोंदणीद्वारे स्वतः नोंदणी करू शकतात.
  • ऑनलाईन नोंदणी पुढील वेबसाईटद्वारे करता येईल: https://mahadbtmahart.gov.in
  • नवीन नोंदणी करण्यासाठी "New Applicant Registration" बटण वर क्लिक करा
  • आधार क्रमांकाचा उपयोग करून नोंदणी करणे
  • नोंदणी प्रक्रिया खालीलप्रमाणे :
  • नोंदणी प्रकार वैयक्तिक / गट
  • वैयक्तिक स्वतंत्ररित्या वैयक्तिक अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याने हा पर्याय निवडावा.
  • गट - सहकारी संस्था नोंदणी, शेतकरी उत्पादक कंपनी, गैर सरकारी संस्था, शेतकरी गट, उद्योजक
  • तुमच्याकडे आधार कार्ड आहे?
  • कृपया नोंदणी प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी "Yes" पर्याय निवडा आणि "Continue" बटण वर क्लिक करा
  • प्रमाणीकरण प्रकार निवडा दोन प्रमाणीकरण प्रकार उपलब्ध आहेत
  • OTP - मोबाइल नंबर आधार नोंदणीकृत असेल, तर वापरकर्ता (User) प्रमाणीकरण प्रकार "OTP" निवडा.
  • बायोमेट्रिक मोबाइल नंबर आधार नोंदणीकृत नसेल, तर वापरकर्ता (User) प्रमाणीकरण प्रकार "Biometric" निवडा
  • मोबाइल नंबर आधार नोंदणीकृत असेल तर प्रमाणीकरण प्रकार "OTP" निवडा
  • महाराष्ट्र शासनाला DBT साठी आधार विवरण बद्दल संमती देण्यासाठी "Consent Check Box" वर क्लिक करा
  • वैध आधार क्रमांक प्रविष्ट (type) करा आणि "send OTP" बटण वर क्लिक करा. प्रणाली (system) आधार क्रमांक प्रमाणित करून प्रणाली निर्मित (system generated) "OTP" आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वर पाठविते
  • एक सूचना संदेश प्रदर्शित होतो आधार प्रमाणीकरणासाठी "OTP" आपल्या आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वर पाठविण्यात आला आहे. "OK" बटण वर क्लिक करा
  • प्रणाली प्राप्त "OTP" प्रविष्ट (type) करा 'Verify OTP' बटण वर क्लिक करा
  • यशस्वी OTP पडताळणी केल्याची सूचना स्क्रीनवर प्रदर्शित होईल "प्रमाणीकरण यशस्वी! कृपया सुरु ठेवा". नोंदणीकरण प्रक्रिया सुरु ठेवण्यासाठी "OK" बटण वर क्लिक करा
  • यशस्वी OTP तपासणी (सत्यापन) केल्यानंतर अर्जदाराचे UIDAI कडून प्राप्त तपशील प्रसिद्ध होईल :
  • * वैयक्तिक माहिती तपशील
  • वास्तव्याच्या तपशील
  • बँक तपशील
  • तपशिलांमध्ये काही बदल असल्यास, माहिती अद्ययावत करण्यासाठी अर्जदाराने UIDAI अथवा जवळच्या आधार नोंदणी केंद्राशी संपर्क साधावा.
  • अर्जदाराचे वापरकर्ता नाव आणि पासवर्ड निर्माण करणे प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी अर्जदाराने वापरकर्ता नाव आणि पासवर्ड निर्माण करणे आवश्यक आहे
  • वापरकर्ता नाव (Username) सूचना
  • अर्जदाराने वापरकर्ता नाव असे निवडावे कि जे याअगोदर प्रणालीमध्ये वापरलेले नाही व अन्यन्य आहे. वापरकर्ता नावामध्ये (Username) केवळ अक्षरे आणि संख्या असाव्यात आणि कमीत कमी ४ व जास्तीत जास्त १५ वर्ण असावेत.
  • टीप विभागात संकेतशब्दचे (पासवर्ड) स्वरूप कसे असावे त्याबद्दल सूचना प्रदर्शित केली जाते.
  • अर्जदाराने वापरकर्ता नाव (Username), संकेतशब्द (पासवर्ड) आणि संकेतशब्द (पासवर्ड) पुष्टी प्रविष्ट करा,
  • अर्जदाराने आपला वैयक्तिक वैध मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा, प्रणाली ला अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी ही पायरी अनिवार्य आहे. अर्जदाराने मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून 'Get OTP for Mobile Number Verification' बटनवर क्लिक करा. अर्जदाराने प्राप्त OTP दिलेल्या मजकूर बॉक्समध्ये प्रविष्ट करून 'Verify OTP for Mobile Number' बटन वर क्लिक करावे. प्राप्त OTP केवळ ३० मिनिटांसाठी वैध असेल.
  • अर्जदाराने आपला वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करून बटनवर क्लिक करावे.
  • टीप: ई-मेल आयडी सत्यापन अनिवार्य नाही, परंतु आपल्या अर्जाचाबतची अद्यतने वेळोवेळी प्राप्त होण्यासाठी ई- मेल आयडी सत्यापन करण्यासाठी अर्जदारास शिफारस केली जाते. यासाठी अर्जदाराने ई-मेल आयडी प्रविष्ट करून 'Get OTP for Email ID Verification' बटन वर क्लिक करावे. ई-मेल आयडी वर प्राप्त OTP दिलेल्या मजकूर बॉक्समध्ये प्रविष्ट करून 'Verify OTP for Email ID' बटन वर क्लिक करावे, प्राप्त OTP केवळ ३० मिनिटांसाठी वैध असेल,
  • सत्यापन पडताळणी नंतर, कंप्चा  प्रविष्ट करून बटन वर क्लिक करा,
  • अर्जदार नोंदणीकृत यूजर आयडी व पासवर्ड वापरून आपले सरकार डीबीटी पोर्टलवर लॉगिन करू शकतात
  • अशाप्रकारे आधार क्रमांकांद्वारे आपले अर्जाची  नोंदणी पूर्ण होईल .

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने