प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना

 प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना

भारतात सध्या 81 कोटींहून अधिक लोकांना सरकारकडून 5 किलो मोफत धान्य दिले जात आहे. या योजनेत गरीब कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्य मोफत दिले जाते. आणि या योजनेचा कालावधी आता 5 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

 आता तुम्हाला या PM गरीब कल्याण योजनेचा लाभ 2029 पर्यंत मिळेल. या योजनेसाठी सरकार 5 वर्षांत 11.80 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

आपल्याला माहित आहे की, कोरोनाच्या काळात प्रत्येकाच्या नोकऱ्या गेल्या. आणि लोक त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू विकत घेऊ शकत नव्हते, आणि चांगले खाउ - पिऊ शकत नव्हते. त्यावेळी सर्व कुटुंबांची व्यवस्था बिघडली होती. त्यामुळे सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागला. आणि अनेक लोकांनी नोकरीही गमावली होती. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी   लक्षात घेऊन सरकारने देशातील लोकांच्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरू केली होती. ही योजना 26 मार्च 2020 रोजी सुरू झाली होती .

 सर्व गरीब लोकांना चांगले अन्नधान्य मिळावे हा या योजनेचा उद्देश आहे. तेही मोफत, जेणेकरून त्याच्या कुटुंबाची स्थिती सुधारेल आणि तो आपले जीवन चांगल्या प्रकारे जगू शकेल.

योजनेचे उद्दिष्ट

  •  सर्व गरीब लोकांना रेशन देऊन आर्थिक मदत करणे.
  • सर्व गरीब कुटुंबांना दरमहा 5 किलो धान्य दिले जाईल.
  • गरीब लोकांना मोफत रेशन देऊन त्यांना मदत दिले जाईल

योजनेचे फायदे

  •  या योजनेअंतर्गत, देशातील 80 कोटी लोकांना थेट लाभ मिळतील, ज्यामुळे आर्थिक  साहाय्य आणि समर्थन मिळेल.
  • समाजातील सर्वात असुरक्षित घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अंत्योदय आणि केसरी  कार्डधारकांना या योजनेद्वारे मदत मिळेल.
  • अंत्योदय कार्डधारकांना मदतीची वाढती गरज लक्षात घेता, केसरी कार्डधारकांच्या तुलनेत दुप्पट रेशन वाटप मिळेल.
  • सर्व गरीब व्यक्तींना अत्यावश्यक रेशन पुरवठ्याच्या तरतुदीद्वारे, त्यांचा आर्थिक भार कमी करून आणि मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल.
  • प्रत्येक महिन्याला, पात्र गरीब कुटुंबांना 5 किलो धान्याचे वाटप केले जाईल, जे त्यांच्या पोषण सुरक्षा आणि कल्याणासाठी योगदान देईल.
  • या योजनेचा एक भाग म्हणून, गरिबी कमी करणे आणि उपासमार रोखणे या उद्देशाने गरीब व्यक्तींना मोफत रेशनचे वाटप केले जाईल.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी पात्रता

पीएम गरीब कल्याण योजना 2024 साठी पात्रता निकषांमध्ये खालील अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे:

  • ज्या महिलांनी आपला पती गमावला आहे आणि अशा प्रकारे विधवा झाल्या आहेत त्या योजनेंतर्गत मिळणाऱ्या सर्वप्रकारच्या केलेल्या लाभांसाठी पात्र आहेत.
  • गंभीर आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देत गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले लोक या योजनेद्वारे मदतीसाठी पात्र मानले जातील.
  • अपंग व्यक्ती, त्यांच्या अपंगत्वाचा प्रकार किंवा तीव्रता विचारात घेता, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मदतीसाठी पात्र आहेत.
  • 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती लाभांसाठी पात्र आहेत कारण ते वयानुसार त्यांची कमजोरी आणि वाढत्या गरजा लक्ष्यात घेता त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. 

 आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • शिधापत्रिका
  • मोबाईल नंबर

  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2024 साठी नोंदणी कशी करावी.

या योजनेच्या माध्यमातून सरकारने गरिबांसाठी अन्न वाटप योजना सुरू केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या ऑनलाइन अर्ज सुरू करता येत नाही. कारण जर तुमचे नाव अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या यादीत असेल. किंवा तुम्ही अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी आहात. त्यामुळे सरकारी स्वस्थ धान्य दुकानात जाऊन याचा लाभ घेऊ शकता..

अशाप्रकारे आपण  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि लेख वाचल्याबद्दल धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने