शेळीपालन करण्याकरिता मिळणार आता 10 लाख रुपयांचे अनुदान

 शेळीपालन करण्याकरिता मिळणार आता 10 लाख रुपयांचे अनुदान

 


शेळीपालन करण्याकरिता मिळणार आता 10 लाख रुपयांचे अनुदान : Sheli Palan Yojana 2024. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना शेळी आणि मेंढी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना शेळी आणि मेंढी खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाईल.

 शेळीपालन योजनेची उद्दिष्ट:

  •  राज्यात पशुपालनासाठी प्रोत्साहन देऊन नागरिकांना स्वरोजगार उपलब्ध करून देणे हा पंचायत समिती शेळी पालन योजना चा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील पशुपालकांचे जीवनमान सुधारणे तसेच त्यांचा सामाजिक आर्थिक विकास करून त्यांना सशक्त आत्मनिर्भर बनविणे.
  •  पशुपालकांना पशुपालनासाठी शेळ्या मेंढ्यांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
  • राज्यात दूध आणि मांस यांच्या उत्पादनात वाढ करणे.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करून नवीन उद्योग निर्माण करणे राज्याचा आर्थिक विकास करणे.
  •  शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच शेळी-मेंढीपालन या परंपरेला चालना देणे.

 शेळीपालन योजनेची वैशिष्ट्य:

·         पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळी पालन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

  • अर्ज करताना अर्जदाराला कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये या उद्देशाने शेळी पालन ऑनलाईन अर्ज ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे अर्जदार पशुपालक आपल्या घरी बसून मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व स्थिती वेळोवेळी प्राप्त करू शकतो. त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.

 शेळीपालन कर्ज योजना चे लाभार्थी:

  • राज्यातील शेतकरी,पशुपालक सामान्य नागरिक या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

 अशा नागरिकांना दिले जाणार प्राधान्य:

ज्या नागरिकांनी पशुपालन प्रशिक्षण प्राप्त केले आहे अशा नागरिकांना शेळीपालन अनुदान अंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
  • दारिद्रय रेषेखालील कुटुंब
  • अल्प अत्यल्प भूधारक (1 हेक्टर पर्यंतचे भू धारक)
  • अल्प भूधारक (1 ते 2 हेक्टर पर्यंत भूधारक)
  • सुशिक्षित बेरोजगार (रोजगार स्वयंरोजगार केंद्रात नाव असलेले)
  • महिला बचत गटातील लाभार्थीस या योजनेचा लाभ.

 शेळी पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत दिले जाणारे अनुदान:

शेळीपालन कर्ज अंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रवार्गातील लाभार्थ्यांसाठी 75 टक्के तर खुल्या प्रवर्गातील प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येते

श्रेणी

एकूण मादी नरांची संख्या

अर्थसहाय्य(अनुदान)

1.

100 मादी 5 नर या करिता अनुदान

10 लाख रुपये

2.

200 मादी 10 नर या करिता अनुदान

20 लाख रुपये

3.

500 मादी 25 नर या करिता अनुदान

50 लाख रुपये


शेळीपालन योजना चा फायदा:

  • राज्यातील शेतकरी,पशुपालक,नागरिक यांना शेळी मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल.
  • राज्यात नवीन स्वरोजगार सुरु होईल इतर नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यामुळे राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल राज्याचा औद्योगिक विकास होईल.
  • राज्यातील पशुपालकांचे जीवनमान सुधारेल.
  •  पशुपालकांच्या सामाजिक आर्थिक विकास होईल ते सशक्त आत्मनिर्भर बनतील.
  • शेळीचे दूध लोकर इत्यादी उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत होईल.
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

अटी शर्ती:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच मेंढी पालन योजना चा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्या Shelipalan Yojana अंतर्गत लाभ घेतला असता कामा नये.
  • जी व्यक्ती पशुपालन करण्यासाठी उत्सुक आहे त्यांच्याजवळ शेळी ठेवण्यासाठी स्वतःच्या मालकीची किमान 9 हजार वर्ग मीटर जमीन असणे आवश्यक आहे ज्यांमध्ये 100 शेळ्या 5 मेंढे राहू शकतील.
  • अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर असणे आवश्यक आहे.
  • पशुपालकाकडे शेळ्या मेंढ्यांची देखभाल त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे चारा उगवण्यासाठी जमीन असणे आवश्यक आहे.
  • योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदाराला स्वतःजवळील 2 रुपये भरणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला शेळी मेंढी पालनाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार अनुसूचित जाती / जमाती चा असल्यास त्याला अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  •  अर्जदाराला अर्जासोबत राशन कार्डवर जेवढे सदस्य आतील त्या सर्व सदस्यांची नावे त्यांचा आधार नंबर इत्यादी माहिती सादर करणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.

आवश्यक कागदपत्रे:

  • अर्जदाराचे आधार कार्ड.
  • रेशन कार्ड.
  • रहिवाशी दाखला.
  • मोबाईल नंबर.
  • -मेल आयडी.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास).
  • जमिनीचा (7/12 8 उतारा).
  • पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र.
  • बँक खात्याची माहिती.
  • उत्पन्नाचा दाखला.
  • अर्जदार दिव्यांग असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र.
  • हमीपत्र / बंधपत्र

अर्ज कसा करावा:(ऑनलाईन)

  • अर्जदाराला शेळी पालन योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://nlm.udyamimitra.in/ वर जावे लागेल.
  •  होम पेज वर शेळी मेंढी पालन योजना अर्ज वर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करावी. 
  • सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुमची शेळी पालन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

अर्ज कसा करावा:(ऑफलाईन )

  •  अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जावे लागेल.
  •  कृषी विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील सदर अर्ज पशुसंवर्धन विभागात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची शेळी पालन योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अशाप्रकारे आपण अर्ज करून शेळी पालन योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने