RTE शाळा प्रवेश अर्ज-२०२४-२५

RTE शाळा प्रवेश अर्ज-२०२४-२५



             सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल सामाजिक शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत  सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्ष पालकांना दिनांक १६.०४.२०२४ पासून  https://student.maharashtra.gov.in/adm_portal या लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.                                                                                                                        

    RTE अंतर्गत खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, तुम्ही RTE द्वारे २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत खाजगी शाळेत प्रवेश अर्ज  तुमच्या सोयीनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन सबमिट करू शकता. ऑफलाइन प्रवेश अर्ज सबमिट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या शाळेशी संपर्क साधावा लागेल, तर ऑनलाइन प्रवेशामध्ये, तुम्ही घरी बसून यशस्वीरित्या ऑनलाईन फॉर्म भरून  तुमचा प्रवेश सबमिट करू शकता.

 RTE शाळा प्रवेश निवड यादी:

 आरटीई कायद्यांतर्गत, ज्या विद्यार्थ्यांनी २०२४-२५  या वर्षाकरिता RTE अंतर्गत  शाळांमध्ये प्रवेशासाठी नोंदणी पूर्ण केली आहे, त्या अशा विद्यार्थ्यांची निवड यादी शाळेद्वारे प्रसिद्ध  करण्यात येईल .निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे RTE च्या निवड यादीमध्ये उपलब्ध करून दिली जातील, त्यानंतरच ते त्यांचा प्रवेश अर्ज भरू शकतील.

 RTE प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आरटीई प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांना त्यांचे पालक आणि पालक यांची आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील, त्यानंतरच त्यांचा प्रवेश अर्ज सादर करता येईल.
  • आधार कार्ड.
  • जन्म प्रमाणपत्र.
  • उत्पनाचा दाखला.
  • पत्त्याचा पुरावा.
  • जात प्रमाणपत्र.
  • मोबाईल नंबर.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • पालकांचे आधार कार्ड.
  • रेशन कार्ड इ.

 RTE कायदा:

शिक्षणाचा अधिकार हा देशभरात मंजूर झालेला कायदा आहे ज्याच्या अंतर्गत देशातील गरीब लोकांसाठी खाजगी शाळांमध्ये २५% राखीव जागा आहेत. हा कायदा २००९ मध्ये घटनादुरुस्ती अंतर्गत तयार करण्यात आला होता. ही एक योजना आहे ज्या अंतर्गत खाजगी शाळांमधील २५% राखीव जागा देशातील गरीब लोकांसाठी राखीव ठेवल्या जातात. हा कायदा २००९ मध्ये घटनादुरुस्ती अंतर्गत तयार करण्यात आला होता, परंतु तो २०११ मध्ये देशभर लागू करण्यात आला होता, ज्या दरम्यान गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते.

 RTE शाळा प्रवेश अर्ज कसा भरायचा?

  •  RTE शाळा प्रवेश फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी, तुम्हाला RTE च्या अधिकृत पोर्टलवर https://student.maharashtra.gov.in/adm_portal  जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला प्रवेश अर्ज लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • प्रदर्शित पृष्ठावर तुम्हाला नवीन विद्यार्थ्याच्या नोंदणीचा पर्याय दिसेल, तुम्हाला तो निवडावा लागेल.
  • आता तुमच्यासमोर प्रवेश अर्ज उपलब्ध असेल ज्यामध्ये महत्त्वाची माहिती द्यावी लागेल.
  • आवश्यकतेनुसार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा.
  • संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक भरल्यानंतर, तुमचा ऑनलाइन प्रवेश अर्ज सबमिट करा.

 प्रवेश अर्ज भरताना पालकांनी घ्यावी लागणारी काळजी:

  •  ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द  करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरु नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
  • भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा
  • भाडेकरार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा त्याचा कालावधी ११ महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्पयावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरार दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्यापालकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश अर्ज रद्द करण्यात येईल तसेच प्रवेश आरटीई मधून झाला तरी ही संबधित पालकांनी संपूर्ण फी भरावी लागेल.
  • विदयार्थ्यांना निवासस्थानापासून किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा स्वंयअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील, वंचित, दुर्बल सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखादया पालकांनी प्रथम प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्रथम प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडता येईल.
  • विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून किलोमिटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा किंवा शासकीय शाळा नसतील स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना २५ टक्के अंतर्गत सोडत पदधतीने प्रवेश दिला जाईल.
  • अपवादात्मक परिस्थितीत विदयाथ्यांच्या निवासस्थानापासून किलोमीटरपर्यतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा स्वंयअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने होतील.

 शाळा खालील कारणांमुळे आरटीई २५ टक्के प्रवेश नाकारु शकेल :

  • अवैध निवासाचा पत्ता.
  • अवैध जन्मतारखेचा दाखला.
  • अवैध जातीचे प्रमाणपत्र.
  • अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
  • अवैध फोटो आयडी.
  • अवैध दिव्यांग प्रमाणपत्र.

     अशाप्रकारे आपण आपल्या पाल्यांचा RTE ऑनलाईन फॉर्म काळजीपूर्वक भरू शकाल अशी मी अशा करतो.जर तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने