महिला समृध्दी कर्ज योजना - 2024

महिला समृध्दी कर्ज योजना - 2024



नमस्कार मित्रांनो आज आपण महिला समृध्दी कर्ज योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये काय आहे ही योजना, उद्दिष्ट्य, पात्रता, अटी, फायदे, व्याजदर, कर्ज किती मिळणार, परतफेड कालावधी, अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणती याबाबतची सर्व माहिती आपण पाहूयात.

महिला समृध्दी कर्ज योजना:

 महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय विशेष साहाय्य (समाज कल्याण) विभागाकडून महिलांसाठी हे धोरण राबविले जात आहे. या योजनेंतर्गत महिला व्यवसायीकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिला मागासवर्गीयांना आर्थिक मदत दिली जाते.

महिला समृध्दी कर्ज योजना पात्रता:

  • महिला समृध्दी कर्ज योजना ही समाजातील उपेक्षित महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने असल्याने कर्जाचे योग्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी पात्रतेच्या कठोर अटी आहेत.
  • लाभार्थी मागासवर्गीय जात किंवा अनुसूचित जातीचा असला पाहिजे.
  • बचत कर्ज गट (बचत गट) आणि समाजातील मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजकच या कर्ज योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • महिला लाभार्थ्यांचे किमान वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • लाभार्थी बीपीएल श्रेणीतील असावेत.
  • अर्जदाराच्या वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/- पर्यंत असावे तर शहरी भागासाठी अर्जदार कुटुंबाचे रु. १२००००/- पर्यंत असावे.
  • कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असू नये.

महिला समृध्दी कर्ज योजना आवश्यक कागदपत्रे:

  • महिला समृध्दी कर्ज  योजनेचे अर्ज
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाती
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रहिवासी पुरावा (वीज बिल किंवा रेशन कार्ड)
  • ओळख पुरावा - मतदार ओळखपत्र
  • सेल्फ-ग्रुप मेंबरशिप आयडी कार्ड

महिला समृध्दी कर्ज  योजनेचे स्वरुप:

  •  व्याज दर %
  • परतफेडीचा कालावधी वर्षे
  • बचत गटांमार्फत ग्रामीण शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा
  • प्रकल्प मर्यादा रु. लाखापर्यंत बचत गटातील २० सभासदांना प्रत्येकी रु.२५,०००/-
  • राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग - ९५%
  • राज्य महामंडळाचा सहभाग %
  • लाभार्थीचा सहभाग 0%

 महिला समृध्दी कर्ज  योजनेचे वैशिष्ट्ये आणि फायदे

  •   किमान कागदपत्रे
  •  महिलांचा आत्मविश्वास वाढतो.
  • लाभार्थीची सामाजिक-आर्थिक स्थिती बदलते.
  • गरीबीने ग्रस्त असलेल्या कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भूमिका निभावते.
  • रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत करते.
  • महिलांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन मिळते.
  • सशक्त आणि स्वावलंबी बनण्यास मदत होते.

महिला समृध्दी कर्ज योजना अर्ज करण्याची पध्दत-

 या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलेने प्रथम आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात जाऊन सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागात बचत गट शासकीय योजनेचा अर्ज घ्यावा किंवा आम्ही दिलेल्या लिंक https://nsfdc.nic.in/en/mahila-samriddhi-yojana वरून डाऊनलोड करून घ्यावा.

मला आशा आहे की तुम्हाला आमचा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने